UPI Changes from 2024 : आजच्या डिजिटल युगात, UPI ( यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ) हा सिस्टम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक दैनंदिन जीवनात रोज वापरात येणारी गोष्ट बनलीय. परंतु, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या नवीन निर्देशांकानुसार, 2024 मध्ये UPI च्या वापरात पुढील गोष्टींचा मोठा बदल करण्यात आलाय.
सध्या देशात UPI च्या नियमावलीत का बदल करणे गरजेचे होत ? हे तुम्हाला पुढील आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येईल
- सध्या देशात UPI चे वापरकर्ते हे 40 कोटी हुन अधिक आहेत
- 2023 ह्या संपूर्ण वर्षात UPI च्या माध्यमातून झालेले ट्रँझॅकशन हे होते सुमारे 12अब्ज
- 2023 ह्या संपूर्ण वर्षात UPI च्या माध्यमातून झालेले व्यवहार हे होते सुमारे 16 लाख कोटी हुन अधिक
- 2023 ह्या संपूर्ण वर्षात UPI च्या माध्यमातून फ्रॉड होऊन चोरी झालेली रक्कम होती सुमारे 32 हजार कोटी हुन अधिक
- पुढील ३ वर्षात UPI चे एकूण ट्रँझॅकशन हे सुमारे १०० अब्ज होतील असा अंदाज तज्ज्ञांनी लावलेला आहे.
आणि त्यामुळे पुढे फ्रॉड हि होतील त्यामुळे RBI ने UPI च्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
UPI च्या वापरात काय महत्वाचा बदल करण्यात आलाय हे जाणून घ्या अन्यथा तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
काय आहेत ते बदल ? UPI Changes from 2024
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने वाढत असलेला ऑनलाईन स्कॅम रोखण्या साठी पुढील काही महत्वाचे बदल UPI म्हणजेच Phone Pay , Google Pay , Paytm तसेच इतर APP च्या वापरात निर्धारित केलेले आहेत ते बदल पुढील प्रमाणे असतील.
- नेशनल पेमेंट कारपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सुचणे नुसार जर आपण एक वर्ष पेक्षा जास्त काळ झाला असेल आणि आपण आपले यूपीआई आईडी च्या माध्यमातून कोणते हि ऑनलाइन पेमेंट केले नसेल तर आपली ती यूपीआई आईडी ( UPI ID ) 31 डिसेंबर पासून बंद करण्यात येईल. हा निर्णय गूगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या सर्व UPI प्लॅटफॉर्म ला लागू असेल.
- UPI चे पेमेंट लिमिट हे जास्तीत जास्त एक लाख रुपये प्रति दिन असेल.
- फक्त हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था यांच्या साठी च हे UPI चे पेमेंट लिमिट हे जास्तीत जास्त पाच लाख रुपये प्रति दिन असेल.
- आत्ता पर्यंत टॅन्झेक्शन झाले कि लगेचच समोरच्या अकाउंट ला पैसे जमा व्हायचे पण 1 जानेवारी 2024 पासून 2000 च्या आतील रक्कम लगेच जमा होईल आणि त्या पुढील रक्मे साठी किमान 4 तासांचा वेळ लागेल, म्हणजे टॅन्झेक्शन केल्या नंतर ती रक्कम 4 तासांनी समोरच्या व्यक्ती च्या अकाउंट ला जमा होईल.
- वरील नियम नवीन व्यवहार होत असेल तर च लागू होईल म्हणजे तुमचे ह्या अगोदर जर व्यवहार झाले असतील तर तो नियम तुम्हाला लागू नसेल हा नियम फक्त पहिल्यांदा होत असलेल्या व्यवहारासाठी च लागू असेल
- 1 जानेवारी 2024 पासून टॅन्झेक्शन केल्या नंतर 2000 च्या आतील रक्कम लगेच जमा होईल आणि त्या पुढील रक्मे साठी किमान 4 तासांचा वेळ लागेल, आणि त्या 4 तासात तुम्ही हवे तर ते टॅन्झेक्शन कॅन्सल करू शकता आणि ते पैसे तुमच्या अकाउंट ला परत जमा होतील. ह्याचा मुख्य फायदा हा सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्या साठी होतील किंवा चुकून झालेले टॅन्झेक्शन रोखण्यासाठी फायदा होईल
- ह्याचा तोटा एक च होईल कि तुम्ही नवीन ठिकाणी कोणते ट्रान्झेक्शन केले तर ते पैसे 2000 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला ते पैसे पुढे जमा होण्यासाठी 4 तास थांबावे लागेल.
- तसेच तुमची बँक तुमचा ट्रक रेकॉर्ड पाहिलं तुम्हाला UPI च्या माध्यमातून CC किंवा OD सारख्या सुविधा हि देऊ शकते. ज्या द्वारे तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये पैसे नसले तरी हि पुढे पैसे पाठवणे शक्य होणार आहे
आईडी ब्लॉक होण्या पासून वाचण्या साठी काय करावे ?
जर आपल्याला वाटत असेल कि आपले UPI ID चालू राहावे तर त्या वरून 31 डिसेंबर च्या अगोदर किमान एक तरी देवाण घेवाण चा व्यवहार करून ते ऍक्टिव्ह करून ठेवा. अन्यथा ते बंद होऊन जाईल. UPI Changes from 2024