Makar Sankranti 2024 : हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या या भारत देशात अनेक सण- समारंभ साजरे केले जातात. जसे कि गुढीपाडवा, दिपावली, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र, यांसारखाच आणखीन एक महत्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकरसंक्रांत !
आपल्याकडे प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहातो. या पंरंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पुर्वजांचा एक चांगला हेतु असल्याचे लक्षात येते.
कायम १४ जानेवारीलाच एणार हा मकर संक्रातीचा सण हा कधीतरी अपवादात्मक हा सण १३ जानेवारी किंवा १५ जानेवारीला आल्याचे आपण पाहातो. मकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असलेला तो कमालीचा गारठा मात्र ह्या मकरसंक्राती पासुन कमी कमी होत जाऊन उन्हाळ्याची चाहूल सुरु होते.
- सौरकालगणना आणि शेती सोबत संबंध : Makar Sankranti 2024
- मकरसंक्रांतीचे आहारातील असलेले महत्व : Importance of Makar Sankranti
- भोगी चे महत्व : Bhogi Che Mahatv / Bhogi Mhanje Kay ?
- मकर संक्रात : Makar Sankranti Information in Marathi
- किंक्रात : Kinkrant information in marathi / kinkrant mhnje kay
- मकरसंक्रांत साजरा करण्याची पद्धत : Makar Sankranti Celebration
- तिळवण व बोरन्हाण : Tilvan ani Bornhan / Borhan
- मकरसंक्रांती आणि पतंग – ( Makar Sankranti and kite)
- मकर संक्रात आणि प्रादेशिक विविधता :
- भारताबाहेरील देशात मकरसंक्रती :
सौरकालगणना आणि शेती सोबत संबंध : Makar Sankranti 2024
मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या मराठी महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे. ( Makar Sankranti 2024 )
पौष या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. इथून पुढे उन्हाळ्याची चाहूल सुरु झाल्याची जाणीव शेतकऱ्यांना होते. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते
संक्रातीच्या या दिवशी शेतांत आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, ज्वारीची कणसे, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी मातीच्या खणा मध्ये भरून त्या देवाला अर्पण करतात. स्त्रिया एकमेकींना ववसत असताना उखाणे घेऊन एकमेकींना “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” असं म्हणतात.
“तिळगूळ घ्या, गोड गोड बोला”
मकरसंक्रांतीचे आहारातील असलेले महत्व : Importance of Makar Sankranti
संक्रातीच्या या दिवशी शेतांत आलेल्या रबरे, ऊस, ज्वारीची कणसे, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ यांचे वाण एकमेकींना देतात या वाणांची भाजी हि बाजरीच्या भाकरी सह प्रत्येक घरात बनवून खाल्ली जाते.
भोगी चे महत्व : Bhogi Che Mahatv / Bhogi Mhanje Kay ?
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा केला जातो.
आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवस म्हणजे भोगी होय.
घरातील स्वछता, अंगणातील सडा रांगोळी आकाशात उडणारे पतंग हे मोहक दृश्य असत. नवीन लग्न झालेल्या मुली पहिल्या संक्रातीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या बाजरी च्या भाकऱ्या असतात. वांग्या-बटाट्याची भाजी असते आणि त्याच्या जोडीला असते भोगीची भाजी. हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, हुरडा, गाजरे, भुईमुगाचे शेंगदाणे, तीळ इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.
मकर संक्रात : Makar Sankranti Information in Marathi
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतासह इतर हि काही हिंदू बहुल देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।
देवीपुराणातील हा श्लोक, ह्याचा अर्थ असा कि मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि त्या-त्या दान केलेल्या वस्तू सूर्य देवता त्यांना प्रत्येक जन्मात देत असते.
पूर्वीच्या काली पैसे हि गोष्ट च नव्हती, एकमेकां-कडील वस्तू एकमेकांना देऊन जीवन चालत असे. आणि त्याच गोष्टी पूर्वीचे लोक हे मातीच्या खणा मध्ये भरून एकमेकांना दान करी. त्या मातीच्या खणा मध्ये गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.
महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे.
किंक्रात : Kinkrant information in marathi / kinkrant mhnje kay
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशी म्हणजे च करिदिन घरोघरी नॉनव्हेग बनवलं जात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस ‘मट्टू पोंगल’ म्हणून साजरा केला जातो .
मकरसंक्रांत साजरा करण्याची पद्धत : Makar Sankranti Celebration
नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी आपल्या पहिल्या मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची, आणि गोड साखरेपासून बनवलेल्या लह्याचें दागिने परिधान करण्याची देण्याची देखील प्रथा आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं म्हणत तिळ आणि गुळ हे एकमेकांना दिले जातात, तीळ आणि गुळचं का दिला जात असावा ह्याचा शोध घेतला तर आपल्याला हे आढळत कि हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने या थंडीच्या काळात आपल्या शरीरात आवश्यक असलेली उष्णतेची गरज तिळ आणि गुळ पुर्ण करते आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी.
तिळवण व बोरन्हाण : Tilvan ani Bornhan / Borhan
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी हलव्याचे दागिने आणि काळी साडी भेट दिली जाते. मुलीला व जावयालाही पूर्ण पोशाख चा आहेर देऊन त्यांंचे कौतुक केले जाते. त्याला तिळवण म्हणतात.
लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त हलव्याचे दागिने आणि काळ्या रंंगाचे कपडे घालणे घातले जातात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा, चॉकेलट, गोळ्या, छोटी बिस्किटे असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओतून त्यांना ह्यांनी अंघोळ घातली जाते व ते चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा, चॉकेलट, गोळ्या, छोटी बिस्किटे इतरांना दान म्हणून दिले जाते. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. मुलांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
मकरसंक्रांती आणि पतंग – ( Makar Sankranti and kite)
मकरसंक्राती च्या या दिवसांमध्ये बालगोपाळ तल्लीन असतात आपल्या सवंगड्या बरोबर पंतग उडविण्यात. थंडीच्या या दिवसांमध्ये सुर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता मकरसंक्राती काळात बऱ्याच ठिकाणी पंतग मोहोत्सव, पतंग बनविण्याचे कला शिकवणे ह्याचे आयोजन हि केल्याचे आढळते. पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरता हजारो पर्यटक विविध राज्यात हि जातात.
मकर संक्रात आणि प्रादेशिक विविधता :
मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती भारतातील विविध राज्यात उत्साहाने साजरी केली जाते. विविध भागात या सणाला विविध नावाने ओळखले जाते.
हिमाचल प्रदेश आणि पंजाब – लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
बिहार – ‘संक्रान्ति, ‘खिचडी’.
आसाम – भोगाली बिहू, (Bhogali Bihu)
पश्चिम बंगाल आणि ओरिसा – मकर संक्रान्ति
गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
कर्नाटक व आंध्र प्रदेश – (संक्रांति)
तमिळनाडू – पोंगल, (Pongal)
भारताबाहेरील देशात मकरसंक्रती :
भारतासह इतर हि काही हिंदू बहुल देशांमध्ये मकर संक्रात साजरा केली जाते, तिथेही ह्या सणाला मात्र वेगळ्या नावाने ओळखले जाते.
थायलंड – सोंग्क्रान
नेपाळमध्ये – माघी, माघ संक्राति.
म्यानमार – थिंगयान
लाओस – पि मा लाओ (Pi Ma Lao)