TATA Nexon Compact SUV सेगमेंटमधील Car मध्ये सध्या तीव्र स्पर्धा सुरु आहे. डिसेंबर 2023 च्या विक्रीत प्रथमच Compact SUV सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. या कारने केवळ त्याच्या Compact SUV सेगमेंटमधील इतर गाड्यांना मागे सोडले नाही, तर अनेक वर्षांपासून बाजारात अव्वल असलेल्या मारुतीच्या कार्स ला हि पिछाडीवर सोडले आहे. ( SUV • Tata Nexon • Hyundai Motor Company )
TATA Nexon Compact SUV
TATA Motors ने डिसेंबर २०२३ च्या विक्रीत आश्चर्यकारक कामगिरी केली असून. लोकांना कंपनीची हि कार इतकी आवडली की गेल्या महिन्यात ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. मासिक विक्रीत नेहमी पहिल्या क्रमांकावर असलेल्या मारुतीच्या कार्स ला पिछाडीवर सोडून TATA Motors ने हा गेम जिंकला आहे.
गेल्या महिन्यात टाटाची स्टार परफॉर्मर कार नेक्सॉन ( TATA Nexon ) ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार होती. इतर स्पर्धक गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर मारुती ब्रेझा ( Maruti Brezza ), किया सोनेट ( Kia Sonet ), ह्युंदाई व्हेन्यू ( Hyundai Venue ) आणि महिंद्रा XUV300 सारख्या कार नेक्सॉनच्या तुलनेत विक्रीत खूप मागे आहेत. Tata Nexon गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फेसलिफ्ट मध्ये लॉन्च करण्यात आलेली, ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांना नवीन Nexon चे डिझाइन आणि अपडेटेड फीचर्स खूपच पसंत पडत आहेत.
नेक्सॉनबद्दल सांगायचे तर, देशातील मध्यमवर्गीयांची आवडती कार असलेल्या मारुती च्या Wagon R, Alto & Celerio ला पराभूत करून तिने नंबर-1 कारचा किताब पटकावला आहे. Nexon ही पहिली कॉम्पॅक्ट SUV आहे जी पहिल्यांदाच असे करू शकली आहे. डिसेंबर 2023 मध्ये, Tata Motors ने Nexon च्या एकूण 15,284 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. नोव्हेंबरबद्दल TATA Nexon ची विक्री 14,916 युनिट्स होती. Nexon ची मासिक विक्री 368 युनिट्सनी वाढली आहे.
टॉप-5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये, मारुतीची कॉम्पॅक्ट सेडान ( Compact Sedan Dzire ) डिझायर 14,012 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या स्थानावर होती. TATA Punch ने तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले. टाटाच्या या छोट्या एसयूव्हीची डिसेंबरमध्ये एकूण 13,787 युनिट्सची विक्री झाली. चौथ्या क्रमांकावर मारुतीची 7-सीटर मारुती एर्टिगा होती ज्याने एकूण 12,975 युनिट्सची विक्री केली. मारुतीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा पाचव्या स्थानावर आहे, तर कंपनीने एकूण 12,844 युनिट्सची विक्री केली आहे.
Nexon चे फेसलिफ्ट व्हर्जन लोकांना वेड लावत आहे. कंपनीने याला पूर्णपणे नवीन फ्रंट फेशिया दिला आहे, ज्यामुळे त्याचा लुक पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहे. यात नवीन डिझाइन केलेले स्प्लिट एलईडी हेडलाइट सेटअप, पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट आणि बॅक बंपर आणि नवीन एलईडी टेल लाईट सेटअप आहे. कंपनीने कारचे केवळ बाह्य डिझाइनच नाही तर आतील भाग देखील पूर्णपणे अपडेट केला आहे. कारच्या आत, नवीन 2-स्पोक स्टीयरिंग व्हील, नवीन डॅशबोर्ड लेआउट आणि नवीन अंतर्गत रंग आता उपलब्ध आहेत.
Tata Nexon पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही सेगमेंट सह इलेक्ट्रिक मध्ये उपलब्ध आहे. यात पहिले 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 120 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे म्हणजे 1.5-लिटर डिझेल इंजिन जे 115 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क आउटपुट देते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड एएमटी आणि नवीन 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) समाविष्ट आहे. डिझेल युनिटसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड एएमटीचा पर्याय देण्यात आला आहे.
कंपनीने नेक्सॉनमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांचीही विशेष काळजी घेतली आहे. Nexon टाटा मोटर्सच्या ALFA प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. यामध्ये इम्पॅक्ट २.० डिझाइन लँग्वेज वापरण्यात आली आहे. टाटा मोटर्स अल्ट्रोझ हॅचबॅकमध्ये अल्फा प्लॅटफॉर्म देखील वापरत आहे. या प्लॅटफॉर्मसह, दोन्ही कार ग्लोबल NCAP (GNCAP) क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
Tata Nexon फेसलिफ्टची किंमत 8.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. त्याच वेळी, टॉप वेरिएंटची किंमत 15.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनी स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि फियरलेस या चार प्रकारांमध्ये एकूण 7 रंग पर्यायांसह त्याची विक्री करत आहे. Nexon थेट Honda Elevate, Kia Sonet, Hyundai Venue आणि Maruti Brezza यांच्याशी स्पर्धा करते.