Kurdu Vanaspati : 100% एक चमत्कारी आयुर्वेदिक वनस्पती

Written by सई

Published on:

kurdu vanaspati : नमस्कार मंडळी, हल्ली च्या ह्या धावपळीच्या जीवनात आपल्याला नकळत अनेक आजार जडतात. त्यावर बरेचसे उपचार करून पण त्याचा फारसा परिणाम काहीं होत नाही पण मंडळी निसर्गाने आपल्याला एवढं काही दिले आहे की, त्या आयुर्वेदिक वनस्पती ह्या आपल्या सभोवताली असतात पण त्यांची माहिती आणि त्यांचे फायदे आम्हाला माहीत नसतात.

आत्ता तुम्ही पहिला असेल च कि आपल्या आसपासच्या लोकांना पित्ताचा त्रास होत असतो. तुमच्या पैकी बऱ्याच लोकांचे सकाळी पोट साफ होत नाही तसेच पोटात गॅस होणे, पोटात जंत होणे, लघवी संबंधीचे त्रास, शारीरिक संबंधित त्रास होतात. आत्ता ह्या वर उपाय म्हणून कुर्डू ह्या वनस्पतीची भाजी बनवून खाल्ल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते असं जुनी जाणकार मंडळी सांगतात. तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर नक्की विचारा.

मुतखडा एका झटक्यात पाडणारी कुर्डू ही वनस्पती ( kurdu vanaspati ) हे आपल्या शेतात वाढणार एक प्रकारचे गवत / तन म्हणून ओळखले जाते. सहजरित्या ओळखता येणारी आणि लहान तांबूस गुलाबी रंगाची फुले येणारी ही रोपवर्गीय वनस्पती एक ते तीन फुटापर्यंत उंच वाढते. येणारी तांबूस गुलाबी रंगाची फुले नंतर पांढरट बनतात म्हणून या वनस्पतीला हिंदी मध्ये सफेद मुर्गा सुद्धा म्हणतात.

या वनस्पतीच्या फुलांमध्ये नंतर काळ्या रंगाचे छोट्या-छोट्या बिया तयार होतात आणि त्यांचा सुद्धा वापर हा औषधांमध्ये केला जातो.

कुर्डू ही वनस्पती रानमाळा डोंगरावर उगवणारी ( kurdu vanaspati ) वनस्पती तुम्हा सर्वांच्या परिचयाची नक्कीच असेल.

कुर्डू या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म / kurdu vanaspati ayurvedic benefits

कुर्डू या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म हे खूप आहेत, त्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला होत असतो. त्यातील काही महत्वाचे गुणधर्म पुढील प्रमाणे :

कुर्डू या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म / kurdu vanaspati ayurvedic benefits
कुर्डू या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म / kurdu vanaspati ayurvedic benefits
  • या बियाचं चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेतल्यास पुरुषांमध्ये काम शक्ती वाढवण्यासाठी मदत होते.
  • कुर्डू च्या बिया शितल गुणधर्माच्या असतात, त्यामुळे ह्याचे सेवन केल्याने शरीरातील हिट कमी होते.
  • लघवी च्या मार्गात अडथळा निर्माण होत असल्यास या कुरडूच्या बियाचं चूर्ण हे खडीसाखराबरोबर घेतल्याने मार्ग मोकळा होतो.
  • मुतखडा झालेला असेल तर कुर्डूचे बिया साखरेबरोबर खाल्ल्यामुळे मुतखडा बाहेर पडण्यास मदत होते.
  • कुर्डू च्या मुळांचे सेवन हि मुतखड्यासाठी उपचार म्हणून केले जाते.
  • वरील औषधी गुणधर्माने परिपूर्ण असणारी ही वनस्पती सहजरीत्या उपलब्ध होणारी आहे.
  • सांधेदुखी वर उपचार म्हणून हि हिचा वापर केला जातो
  • कमजोरी दूर करून शरीरातील थकवा घालवण्यासाठी सुद्धा हि वनस्पती फायदेशीर आहे
  • ज्या लोकांना मुतखडा आहे त्यानी कुर्डू वनस्पती ची मुळे आणि तेवढ्याच प्रमाणात गोखुळ नावाच्या वनस्पतीच्या बिया घेऊन हे दोन्ही एकत्र बारीक करून घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि सकाळी याचा वापर करा.
  • ज्या लोकांचे पोट साफ होत नाही, पोटात दुखणे, पोट गॅस धरणे या संबंधीचा त्रास असेल तर या वनस्पतीची चार पाने दोन दिवस सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी चार पाने नक्की खावी फायदा होईल.
  • ही वनस्पती त्रिदोष नाशक म्हणजे कफ, वात, पित्तशामक आहे, याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही.
  • या वनस्पतीच्या फुलांमध्ये काळे व चमकदार बीज असते. हे बीज आयुर्वेदामध्ये अति उपयुक्त मानले जाते . आयुर्वेदानुसार यांच्या बिया मूत्रल, शितल, शक्ती, बुद्धी वाढवणारे, व रुची वाढवणारे असतात, आणि या बिया कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये सहज मिळतात.

आयुर्वेदानुसार कुर्डू ही वनस्पती अनेक व्याधींवर फायदेशीर आहे. सांधेदुखी जाण्यासाठी, नामर्दाला मर्द बनवणारी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, मुतखडा बाहेर काढण्यासाठी, दाताचे कोणतेही विकार असो म्हणजे दातातील किडा बाहेर काढण्यासाठी दात दुखत असेल तर दुखणे नाहीसे करण्यासाठी कमी करण्यासाठी दातातून रक्त येत असेल तर ते बंद करण्यासाठी याचा फायदा होतो आणि तर ह्या कुरडू वनस्पती ची फुले पाने व मुळे अत्यंत चमत्कारीक असतात. ग्रामीण भागात जनावरांना ही वनस्पती जास्त प्रमाणात घातले तर त्यांना संडास लागते.

कुर्डू वनस्पती च्या बिया, kurdu vanaspati biya, kurdu vanaspati seeds
कुर्डू वनस्पती च्या बिया, kurdu vanaspati biya, kurdu vanaspati seeds

कुर्डू च्या पानांची भाजी करून खाण्याचे फायदे !

  • कुर्डू पानाची भाजी करून हि खाल्ली जाते, कारण पुरुषाच्या जनन संस्थेमध्ये शुक्रजंतूची वाढ होण्यासाठी ही भाजी खूपच उपयुक्त ठरते काही प्रमाणामध्ये लैंगिक थकवा देखील या वनस्पतीने निघून जातो.
  • उन्हाळ्यातील गर्मी नष्ट करण्यासाठी देखील ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे याच्या पानाची भाजी खाल्ल्याने शरीरातील उष्णता ही निघून जाते.
  • त्वचे संबंधी आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील ही भाजी गुणकारी असते.

ह्याचे फायदे अनेक आहेत म्हणून उपलब्ध झाल्यास या वनस्पतीचा भाजी बनवून एकदा आस्वाद घ्या. या वनस्पतीच्या आयुर्वेदिक गुणधर्माचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. ( kurdu vanaspati )

ज्या लोकांना पित्ताशयाचे खडे होतात त्या लोकांना ह्या विकारांमध्ये ही भाजी पथ्यकार आहे म्हणजे तेव्हा ही भाजी पित्ताशयाचे खडे होणाऱ्या खाऊ नये.

( kurdu vanaspati )
  • कुर्डू हि लहान वर्षायू ( एक वर्ष जगणारी ) वनस्पती गवत / तण म्हणून पावसाळ्याच्या आढळते.
  • खोड व फांद्या पन्हाळीदार; पाने साधी, विविध, एकाआड एक; अग्रस्थ कणिशावर लहान, सच्छद, प्रथम गुलाबी नंतर पांढरी होणारी फुले असतात.
  • सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये येतात.
  • बिया चापट, काळ्या, चकचकीत असून त्यांचा उपयोग हा
  • अतिसार, रक्तदोष, मुखव्रण, नेत्ररोग, दृष्टीदोष, मूत्ररोग इत्यादींवर करतात

निष्कर्ष : ( kurdu vanaspati )

आयुर्वेदानुसार कुर्डू ही वनस्पती अनेक व्याधींवर फायदेशीर आहे. सांधेदुखी जाण्यासाठी, नामर्दाला मर्द बनवणारी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, मुतखडा बाहेर काढण्यासाठी, दाताचे कोणतेही विकार असो म्हणजे दातातील किडा बाहेर काढण्यासाठी दात दुखत असेल तर दुखणे नाहीसे करण्यासाठी कमी करण्यासाठी दातातून रक्त येत असेल तर ते बंद करण्यासाठी याचा फायदा होतो आणि तर ह्या कुरडू वनस्पती ची फुले पाने व मुळे अत्यंत चमत्कारीक असतात.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या द्वारे गोळा केलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद

Leave a Comment

You cannot copy content of this page