PCOD लक्षणे, कारणे आणि उपचार पद्धती – PCOD meaning in Marathi 10 Encouraging Insights

Written by सई

Updated on:

PCOD meaning in Marathi किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित समस्या आहे, जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते.

ज्या स्त्रियांना पीसीओडी असतो ज्यामध्ये परिपक्व स्त्री-बीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते. सामान्य भाषेत समजून घ्यायच तर ही आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे,

या लेखात, आपण पीसीओडीच्या संदर्भात माहिती घेऊ, म्हणजे पीसीओडी व्याख्या, कारणे, प्रकार, उपचार पर्याय, सांख्यिकीय अंतर्दृष्टी, खबरदारी आणि प्रतिबंध कसा करता येईल याची माहिती घेऊयात.

Table of Contents

PCOD म्हणजे काय? / PCOD meaning in marathi

PCOD ची व्याख्या / PCOD Mhanje Kay

पीसीओडी किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा एक हार्मोनल विकार आहे ज्यामध्ये लहान गळू असलेले अंडाशय वाढलेले असतात.

गळू म्हणजे : गळू हा पडद्याच्या ऊतींचा पिशवीसारखा कप्पा असतो ज्यामध्ये द्रव, हवा किंवा इतर पदार्थ असतात.

हे गळू नियमित मासिक पाळीत व्यत्यय आणतात आणि या परिस्थितीमध्ये अंडाशयात अपरिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. कालांतराने या अंड्यांचे सिस्ट तयार होतो. हा सिस्ट अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून घेतो. या सिस्ट मधून पुरुषी हार्मोन्सचा स्त्राव होतो. परिणामी, मासिक पाळी अनियमित होते आणि असे झाल्याने संपूर्ण जीववनशैली बिघडून शरीरात प्रजनन समस्या उद्भवू शकतात, तसेच इतरही विकार उद्भवतात. PCOD ही एक बहुआयामी स्थिती आहे ज्यामध्ये विविध लक्षणे आहेत जी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आढळतात. ( PCOD meaning in marathi )

PCOD होण्याचे कारण / Reason for PCOD

PCOD होण्यामागचे नेमके कारण सांगणे शक्य नाही, परंतु बदलती जीवनशैली, ताण, नैराश्य, लठ्ठपणा, अनुवांशिकता, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि जळजळ यासारखे घटक भूमिका बजावतात असे मानले जाते. या मुळे जगभरात अनेक स्त्रियांमध्ये हा विकार आढळतो आहे. प्रभावी व्यवस्थापन आणि उपचारांसाठी हे कारक घटक समजून घेणे महत्त्वाचे आहे. ( PCOD in Marathi )

PCOD मुळे वंध्यत्व येण्याची शक्यता अधिक असते. यावर योग्य आणि वेळेत उपचार झाले नाही तर मधुमेह तसेच हृदयाचे विकार सुद्धा उद्भवतात.

PCOD म्हणजे काय?
PCOD कोणाला आणि कधी होतो?
पीसीओडीची लक्षणं काय आहेत?
PCOD meaning in marathi
pcod symptoms in marathi
pcos meaning in marathi
pcod meaning in marathi
PCOD म्हणजे काय? PCOD कोणाला आणि कधी होतो? पीसीओडीची लक्षणं काय आहेत ? PCOD meaning in marathi pcod symptoms in marathi pcos meaning in marathi pcod meaning in marathi

PCOD कोणाला होऊ शकतो ? / PCOD कोणाला आणि कधी होतो? / पीसीओडी लक्षणे

PCOD ची समस्या हि पूर्वी 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत होती. पण आता हि समस्या झपाट्याने वाढत आहे आणि १२ ते ५१ वयोगटातील मुलीं तसेच महिलांमध्ये सुद्धा PCOD च्या समस्येचे लक्षणं दिसून येतात. याच कारण मुख्यतः जीवनशैलीतले बदल आणि वाढत्या हार्मोनल समस्या आहे. आजच्या काळात १०० पैकी १० महिलांमध्ये PCOD ची समस्या आढळते मुख्यतः तेव्हा, जेव्हा स्त्रियां गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात.

PCOD आणि PCOS मधील फरक: / Difference between PCOD and PCOS

PCOS म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम.

PCODPCOS
व्याख्या / वर्णनPCOD ही एक स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशयात बरीच अपरिपक्व अंडी निर्माण होतात, ज्याचे नंतर सिस्ट तयार होतात. ज्यामुळे वेळेवर स्त्रीबीज फुटत नाही आणि पीरिअड्स इर्रेग्युलर होतात ज्यामुळे गर्भधारणेत अडचण निर्माण होते.तसेच PCOS हा मेटाबॉलिक विकार आहे जो PCOD पेक्षा अधिक गंभीर आहे. या परिस्थितीत, अंडाशय जास्त प्रमाणात एंड्रोजन रिलीज करते आणि अंडाशयात अनेक सिस्ट तयार होतात. ज्यामुळे स्त्रीबीज निर्मिती थांबते.
होण्यामागची करणे / लक्षणेवजन वाढणे
ताण
हार्मोनल असंतुलन
जीवनशैलीतील बदल
इन्सुलिन प्रतिकार
हार्मोनल असंतुलन
आनुवंशिक करण
एंड्रोजन च्या लेव्हल्स वाढणं

पीसीओडीचे प्रकार शोधणे / Types of PCOD

पीसीओडी ही एक-प्रकारात बसणारी मेडिकल स्थिती नाही; हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रकट होते, आणि त्या प्रत्येक प्रकारची अद्वितीय वैशिष्ट्ये हि वेग वेगळी च असतात . या प्रकारांचा अभ्यास करून, व्यक्ती त्यांच्या विशिष्ट परिस्थितीबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि त्यानुसार पीसीओडी व्यवस्थापित करण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन तयार करू शकतात.

Pcod symptoms in marathi / पीसीओडीची लक्षणं काय आहेत?

PCOD विकाराची लक्षणे / Symptoms of PCOD in Marathi / पी. सी. ओ. डी. विकाराची लक्षणे

PCOD ची लक्षणे प्रत्येकामध्ये स्त्रियां मध्ये हि वेगवेगळी असतात, त्या मधील काही लक्षणे पुढील प्रमाणे

  • अनियमित मासिक पाळी : PCOD असणाऱ्या महिलांना शक्यतो नेहमीच्या तारखेला मासिक पाळी येत नाही, ती पाळी अनियमित पणे नेहमीच्या तारखेपेक्षा खूप उशिराने पाळी येते. कधी कधी हा दोन मासिक पाळ्यांमधील गॅप हा दोन ते सहा महिने असतो, आणि जेंव्हा अचानक पाळी येते तेंव्हा होणारा रक्तप्रवाह अधिक प्रमाणात असतो. अशावेळी महिलांनी तातडीने डॉक्टरांना दाखवणे अतिशय गरजेचे असते.
  • त्वचेमधील बदल: PCOD असणाऱ्या महिलांना असंतुलित हार्मोन्स मुळे त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर तसेच पाठीवर पुरळ येण्याचे प्रमाण वाढते. तसेच मानेच्या मागच्या बाजूला, काखेत, खाजगी भागात काळपटपणा जाणवतो.
  • जास्त केस गळती : PCOD असणाऱ्या महिलांमध्ये पुरुषी हार्मोन्स चे प्रमाण वाढल्याने डोक्यावरील केसांच्या गळतीचे प्रमाण आढळते. केस पुरुषांप्रमाणे गळू लागतात. केसांची योग्य निगा राखून सुद्धा केस गळती होते. .
  • शरीरावरील अतिरिक्त केसांची वाढ: PCOD असणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील केसांची गळती होते परंतू चेहरा, हात-पाय, पाठीवर आणि पोटावर तसेच छातीवर सुद्धा केसांची अतिरिक्त वाढ होत असल्याचे आढळून येते. PCOD in Marathi
  • लठ्ठपणा : PCOD असणाऱ्या अधिकांश महिलांमध्ये शारीरिक लठ्ठता असण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. वजन कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा करून सुद्धा जर वजन कमी होत नसेल तर हे नक्कीच PCOD चे लक्षण आहे समजावे.
  • गर्भधारणेत अडथळा: PCOD असणाऱ्या महिलांना गर्भधारण करण्यात अडथळे येतात.
  • मानसिक ताण आणि तीव्र डोकेदुखी: PCOD असणाऱ्या महिलांमध्ये नैराश्य, तणाव मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि परिणामी तीव्र डोकेदुखी किंवा अर्धशिशी चा त्रास आढळतो.
  • मधुमेह : PCOD असणाऱ्या महिलांना मधुमेह असण्याची शक्यता असते.
  • ओटीपोटात वेदना : अचानक ओटीपोटात वेदना होणे

PCOD वर उपचारासाठी व्यायाम / योगासने / Exercise for PCOD

मध्ये खालील योगासनं केल्यास रिलीफ मिळू शकतो.

PCOD वर उपाय / उपचार / पी. सी. ओ. डी. वर उपाय

PCOD वर उपाय म्हणून त्या वर अजून तरी कोणती हि औषधे बनलेली नाहीत. परंतू आपण योग्य आहार, नियमित व्यायाम, मानसिक संतुलन राखून आपण PCOD वर नियंत्रण आणू शकतो.

  • ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) ही कार्बोहायड्रेट्स असलेल्या खाद्यपदार्थांची रेटिंग प्रणाली आहे. जेव्हा ते अन्न स्वतःच खाल्ले जाते तेव्हा प्रत्येक अन्न आपल्या रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी किती लवकर प्रभावित करते हे दर्शवते. जसं कि, धान्य, शेंगा, विविध प्रकारच्या बिया, फळं, प्रक्रिया न केलेले पदार्थ यांचे सेवन करावे.
  • ओमेगा फॅटी ऍसिड चे सेवन : ओमेगा फॅटी ऍसिड असलेल्या घटकांचा समावेश आहारात करावा जसे कि, आळशी च्या बिया, शेंगदाणे, मासे, चिआ सीड्स.
  • तसेच चरबीयुक्त पदार्थ, ऑलिव्ह ऑइल, सुका मेवा, बदाम, पिस्ता, डार्क चॉकोलेट यांचे सेवन योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.
  • पालेभाज्यांचा आहारातील समावेश : सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या यांचा आहारामध्ये समावेश करावा.
  • सॅलड चा आहारातील समावेश : कच्च्या फळभाज्यांचे सॅलड बनवून खावे जसे कि काकडी, गाजर, बीट, कोबी, पांढरा कांदा यांचा समावेश होतो. कच्च्या फळभाज्यांचे सेवन जेवणाच्या आधी किंवा रिकाम्या पोटी करावे.
  • दालचिनी, लवंग, हळद या सारख्या गरम मसाल्यांचा समावेश आहारात करावा.
  • नियमित व्यायाम करावा आणि योग केल्याने ताण तणाव कमी होतो. ताण तणाव कमी होणे PCOD च्या महिलांसाठी अतिशय गरजेचे आहे, त्या मुळे PCOD असलेल्या महिलांना नियमित योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.
  • जास्त प्रमाणात पाणी पिणे हा हि सल्ला डॉक्टर कडून दिला जातो.
  • किमान 8 तास झोप घ्या.

PCOD मध्ये महिलांनी काय टाळावे / पीसीओडी आणि पीसीओस ट्रीटमेंट

सु-नियोजित PCOD आहार हा लक्षणे उपचारामध्ये लक्षणीय फरक करू शकतो. योग्य खाद्यपदार्थ निवडून आणि परिस्थिती वाढवू शकणारे पदार्थ टाळून, तुम्ही संप्रेरक समतोल राखू शकता, तुमचे वजन नियंत्रित करू शकता आणि तुमच्या जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवू शकता. तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणारे वजन कमी करण्यासाठी आणि हार्मोनल संतुलनासाठी वैयक्तिकृत PCOD आहार चार्ट तयार करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिक किंवा आहारतज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. . लक्षात ठेवा की तुमच्या आहारातील लहान, शाश्वत बदल तुमच्या PCOD प्रवासात लक्षणीय सुधारणा करू शकतात.

  • प्रक्रिया केलेले अन्न: शर्करायुक्त स्नॅक्स, फास्ट फूड आणि शर्करायुक्त तृणधान्यांसह उच्च प्रक्रिया केलेले पदार्थ, सामान्यत: शुद्ध शर्करा आणि अनारोग्यकारक चरबी ने भरलेले असतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, वजन वाढू शकते आणि इन्सुलिन प्रतिरोधकता वाढू शकते, हे सर्व PCOD असलेल्या महिलांना टाळणे योग्य ठरते
  • साखरयुक्त पेये: साखरयुक्त शीतपेये, फळांचे रस आणि एनर्जी ड्रिंक्स टाळावे. ते सहसा जोडलेल्या साखरेने भरलेले असतात जे रक्तातील साखरेची पातळी त्वरीत वाढवू शकतात. हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी, हर्बल चहा किंवा गोड न केलेले पेये निवडा आणि PCOD आणि थायरॉईड आहार व्यवस्थापनात मदत करा.
  • जास्त साखरयुक्त पदार्थ: केक, पेस्ट्री, कँडीज आणि इतर शर्करायुक्त पदार्थ कमी प्रमाणात सेवन केले पाहिजेत. त्यांच्या उच्च साखर सामग्रीमुळे रक्तातील साखरेमध्ये जलद चढउतार होऊ शकतात.
  • जास्त कॅफीन: मध्यम प्रमाणात कॅफीन घेणे सुरक्षित असले तरी, कॅफीनचे जास्त सेवन हार्मोन संतुलनात व्यत्यय आणू शकते.
  • रेड मीट: लाल मांसाचा जास्त वापर, विशेषत: सॉसेज आणि हॉट डॉग सारख्या प्रक्रिया केलेले लाल मांस, PCOD च्या वाढत्या जोखमीशी संबंधित आहे. मासे, कुक्कुटपालन आणि वनस्पती-आधारित स्त्रोतांसारखे प्रथिनांचे स्रोत निवडा
  • दारू आणि सिगरेट टाळणे
PCOD in Marathi
PCOD in Marathi

PCOD चे निदान / PCOD पासून कसे वाचावे

  • चेहऱ्यावरील, पाठीवरील, पोटावरील अतिरिक्त वाढलेल्या केसांवरून, अतिरिक्त वाढलेल्या वजनावरून PCOD असल्याचे लक्षात येते. असे आढळून आल्यास आपल्या डॉक्टरांना त्वरित दाखवावे.
  • रक्ततपासणी: डॉक्टरांना सल्ल्याने PCOD साठी विविध रक्तचाचण्या करून घेऊन त्याचे निदान करावे.
  • अल्ट्रासाउंड: PCOD ची लक्षणे दिसल्यास डॉक्टर पहिल्यांदा अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला देतात. यातून अंडाशयातील सिस्ट चा आकार लक्षात येतो. किंवा अंडाशयात काय त्रास आहे याचा अंदाज येतो आणि पकोडा वर उपचार करता येतो.

PCOD मध्ये काय करावे आणि काय करू नये

PCOD असलेल्या महलानी खालील प्रकारची काळजी घ्यावी

PCOD in Marathi
PCOD in Marathi
काय करावेकाय करू नये
निरोगी अन्न खारिफाइंड पीठ आणि जंक फूड खाणे बंद करा
योग्य विश्रांती घ्याधुम्रपान करू नका
नियमित व्यायाम, योगा कराअल्कोहोल किंवा अल्कोहोल सामग्री असलेली इतर पेये टाळा
वजन नियंत्रित ठेवाजास्त ताण घेऊन नका
औषधे वेळेवर घ्यामासिक पाळीमध्ये काही बदल झालयास त्वरित डॉक्टर ला दाखवा

निष्कर्ष : pcos meaning in marathi

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा बैठ्या जीवनशैलीमुळे वय वर्ष १२ ते ५१ वयोगटातील १०० पैकी १० महिलांना PCOD चा विकार होतो. या विकारामध्ये सुरुवातीला मासिक पाळी चुकल्याचे अनेक महिलांमध्ये दिसून येते. यावर योग्य उपचार न झाल्यास प्रजनन होण्यास सुद्धा अडथळे येऊ शकतात.

योग्य आहार घेतल्यास आणि पूरक व्यायाम केल्यास तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतल्यास PCOD च्या विकारावर नियंत्रण आणता येते. परंतू, एकदा नियंत्रण आणल्या नंतर पुन्हा वाईट जीवनशैलीचा अवलंब केल्यास PCOD चा विकार पुन्हा उद्भवू शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

Pcod चे कारण काय आहे?

PCOD ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये स्त्रियांचे अंडाशय अपरिपक्व किंवा अंशतः परिपक्व अंडी तयार करतात, हे खराब जीवनशैली, लठ्ठपणा, तणाव आणि हार्मोनल असंतुलनामुळे होते.

Pcod उपचार न केल्यास काय होते?

उपचार न केल्यास, भविष्यात PCOD मुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलनामुळे इतर मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

PCOS किती सामान्य आहे?

PCOS अंदाजे 8-13% प्रजनन-वृद्ध महिलांना प्रभावित करते. जगभरात ७०% प्रभावित महिलांचे निदान झालेले नाही. पीसीओएस हे एनोव्हुलेशनचे सर्वात सामान्य कारण आणि वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे.

PCOS सर्वात जास्त कुठे आहे?

PCOS चा प्रसार UK मध्ये राहणार्‍या कॉकेशियन लोकांपेक्षा दक्षिण आशियाई लोकांमध्ये जास्त आहे असे मानले जाते.

द्विपक्षीय पॉलीसिस्टिक अंडाशय म्हणजे काय?

डाव्या आणि उजव्या अंडाशयातून पर्यायाने दर महिन्याला एक अंडं बाहेर पडतात जे ‘अँड्रोजन’ संप्रेरक काही मिनिटांत स्रवतात. त्यांना द्विपक्षीय पॉलीसिस्टिक अंडाशय म्हणतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page