वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण ; मनोज जरांगे पाटील यांना व्यक्त केली शंका

Written by सई

Published on:

संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या सुनावणी सुरू असून, या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचे सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे. वाल्मिक कराड हे सध्या बीड येथील कारागृहात आहेत

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुल यांना तुरुंगात मारहाण करण्यात आली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीड कारागृहात बंद असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया .

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण केल्याचे वृत्त आहे. त्याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले, खरोखर वास्तव मध्ये काय झाले आणि काय नाही हे आता कारागृह प्रशासनालाच माहिती असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page