विश्वास नांगरे पाटील : Vishwas Nangare Patil information in Marathi | Hero of 26/11.

Written by सई

Updated on:

Vishwas Nangare Patil information in Marathi: भारतीय कायद्याच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात, विश्वास नांगरे पाटील यांच्याइतकी काही नावे झळकत आहेत. त्याच्या कामाच्या पद्धती आणि त्या कामासाठी अतूट समर्पणासाठी ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील हे भारतीय पोलिस सेवा (IPS) समुदायातील एक आख्यायिका बनले आहेत.

या लेखात, आम्ही लाखो महत्त्वाकांक्षी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या व्यावसायिकांसाठी एक आदर्श बनलेल्या या अविचारी पोलिस अधिकाऱ्याचे जीवन, करिअर आणि उपलब्धी याची तपशीलवार माहिती घेणार आहोत.

Vishwas Nangare Patil information in Marathi

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण Vishwas Nangare Patil Education in Marathi

५ ऑक्टोबर १९७३ मध्ये बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावचे सरपंच असलेल्या श्री. नारायण नांगरे-पाटील यांच्या पोटी विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण बत्तीस शिराळा या तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून History विषयात B. A . सुवर्ण पदकासह पूर्ण केले. उस्मानिया विद्यापीठातून M.B.A. पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.• ते लहानपणा पासून शाळेत खूप हुशार होते. दहावी मध्ये असताना त्यांचा तालुक्यात पहिला क्रमांक आला होता.महाविद्यालयात असताना बारावीला चांगले गुण मिळाले असताना देखील विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी इंजिनीरिंग ला न जाता B.A. ला प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात असताना त्यांना महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देखील मिळाला होता.

स्पर्धा परीक्षेची ओळख Vishwas Nangare Patil information in Marathi

१२ वी ला असताना त्यांच्या कॉलेजचे UPSC मध्ये भारतात ३ रे आलेले भूषण गगराणी एक व्याख्यान आयोजित केले होते. भूषण गगराणी हे IAS झाले होते ते सुद्धा मराठी साहित्य हा विषय घेऊन व मराठी माध्यमातून परीक्षा देऊन. तेव्हा त्यांना
समजले कि कलेक्टर SP होण्या साठी ची परीक्षा मराठी मधून देता येते. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आपण सुध्दा असे काहीतरी करू. असे त्यांना वाटू लागले. या परीक्षेसाठी काय तयारी करावी लागते त्याची माहिती मिळवू लागले.

१२ वी चा निकाल लागला. विश्वासला ९२% च्या जवळपास मार्क पडले. त्यांना गव्हमेंट इंजिनियरिंग आणि मेकॅनिकल कॉलेजला एंडमिशन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी ठरवले कि आपण इंजिनियरिंग मेडिकल करायचे नाही. आपण आर्टस्‌
ला जायचे व प्रशासकीय सेवा जॉईन करायची आणि अधिकारी व्हायचं

त्यांनी ठरवले IAS, IPS, DC, DYSP नाहीतर PSI ची परीक्षा द्यायची कुठे ना कुठे आपण सिलेक्ट
होऊ. अशाप्रकारचा शांत डोक्याने दोघांनी पुढील ३ वर्षाचा प्लॅन तयार केला. मग कॉलेजला BA ला असताना
NCC चे सर्टिफिकेट, NCC च्या माध्यमातून शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल त्यांना मिळवायचे होते. NCC
च्या माध्यमातून मास लीट्सी, रुलर रीकन्स्ट्रक्शन चे कॅम्प ऑर्गनाईज केले. अशा अनेक कार्यामध्ये भाग घेतला.
अभ्यासासाठी पुस्तके मिळविणे कठीण होत कारण ती महाग होती. त्यांच्या संस्थेत तेवढी पुस्तके पण न्हवती.

त्यांनी गावात एक स्टडी सेंटर बनविले. सहकारी संस्थांकडून मदत जमा केली. त्यांच्या गावचे आमदार
शिवाजीराव देशमुख यांनी १ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मधून मिळवून दिले. मग जवळपास २ ते
अडीच लाख रुपये जमा झाले. त्यातून त्यांनी दिड लाखाची पुस्तके व १ लाखाची छोटी इमारत उभी केली.
पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना पुढच्या दिशा समजू लागल्या. त्याचदरम्यान त्यांचे ग्रेजुएशन पूर्ण झाले.

स्पर्धा परीक्षे चा प्रवास Vishwas Nangare Patil information in Marathi

BA ला त्यांना गोल्ड मेडल मिळाले. मग मुंबई ला SIC ला एंडमिशन मिळले तिकडे ६ महिने अभ्यास केला.
UPSC च्या पहिल्याच Attempt च्या प्रीलियम ला नापास झाले. त्याच वर्षी MPSC ची परीक्षा सुद्धा दिली होती. तिकडे
पहिली प्रीलियम पास झाले. मग मुख्य परीक्षा हि पास झाले. इंटरव्हियु मध्ये त्यांचे सिलेक्शन झाले नाही आणि त्याचे
कारण त्यांना सांगण्यात आले कि तुम्ही हि जवाबदारी स्वीकारण्यासाठी अजून खूप तरुण अहात. नैराश्ये सह डिप्रेशन मध्ये गेले तेंव्हा १९९६ चे ते वर्ष त्यांच्या आयुष्यातील बँड पॅच होता.

त्यांनी अभ्यास सोडून पॉलिटिक्स मध्ये जाण्याचा विचार देखील केला. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले आणि प्रोत्साहन दिले. तू स्वतःला सिद्ध कर अभ्यास कर अजून मेहनत घे. मग त्यांनी वडिलांचे ऐकून १९९७ ला पुन्हा
मुंबईला येऊन अभ्यासाला जोमाने सुरवात केली. आणि ९ महिने खूप तळमळीने अभ्यास केला. मग MPSC मधून डेप्युटी कलेक्टर, STI , PSI अशा १३ परीक्षा या ८ महिन्यांच्या काळात नॉनस्टॉप पास झाले. त्यांचा UPSC चा इंटरव्हियु दिल्लीच्या धोलपूर हाऊस मध्ये झाला. त्यावेळी त्यांना टाय ची गाठ सुद्धा बांधता येत न्हवती. इंग्रजी सुद्धा नीट बोलता येत न्हवते. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांनी त्यांचा इंटरव्हियु घेतला. इंटरव्हियुमध्ये त्यांना घाशीराम कोतवाल बद्दल प्रश्न विचारला गेला. त्याच बरोबर त्यांना हिंदी मधून शेवटच प्रश्न विचारला गेला :

“विश्वास इस दुनिया मे तुम क्यू आये हो? याचे उत्तर त्यांनी असे दिले ” संघर्ष करायला

आतापर्य प्रतिकूल परिसथितीशी संघर्ष करत मी इथंपर्यंत आलोय आणि आता तुम्ही जर मला संधी
दिली तर सिस्टीम मधल्या वाईट गोष्टींशी संघर्ष करायची माझी इच्छा आहे.” आणि हेच उत्तर लेफ्टनंट जनरल
सुरेंद्रनाथ यांना आवडले असावे. त्या इंटरव्हियु मध्ये सगळ्यात जास्त ३०० पैकी २१० मार्क्स मिळाले. १९९७ ला
त्यांचे IPS मध्ये सिलेक्शन झाले तेंव्हा ते फक्त B.A. इतिहास ह्या विषयातील पदवी घेतलेले २४ वर्षाचे तरुण होते.

Vishwas Nangare Patil information in Marathi

Vishwas Nangare Patil information in Marathi

भारतीय पोलीस सेवेत रुजू होणे

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, विश्वास नांगरे पाटील यांनी IPS परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आणि 1997 मध्ये सेवेत रुजू झाले. सुरुवातीला त्यांची नियुक्ती मुंबई पोलिस दलात झाली, जिथे त्यांनी सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम केले. मुंबईतील त्यांच्या कार्यकाळातच त्यांनी त्यांच्या अपारंपरिक पद्धती आणि गुन्हेगारांचा अथक पाठलाग यासाठी नावलौकिक मिळवला.

Vishwas Nangare Patil information in Marathi

विश्वास नांगरे पाटील कामगिऱ्या

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण : विश्वास नांगरे पाटील | Vishwas Nangare Patil

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना त्यांच्या मार्गदर्शना खाली पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ४ मार्च २००७ला छापा टाकून २५० हुन अधिक तरुण-तरुणींना अटक केली होती. त्या नंतर प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २३० हुन अधिक जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.

२६/११चा दहशतवादी हल्ला : विश्वास नांगरे पाटील | Vishwas Nangare Patil

२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी गोळीबार सुरू असलेल्या ताज हॉटेलमध्ये अंगावर सुरक्षाकवच (बुलेटफरूप jaket) नसतांनाही ते पोहोचले होते. तेंव्हा प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत त्यांनी सहाव्या मजल्यापर्यंत पोहचून दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन रूम्स मध्ये जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूम मधून CCTV च्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देऊन एक महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. (विश्वास नांगरे पाटील | Vishwas Nangare Patil)

विश्वास नांगरे पाटील कारकीर्द | Vishwas Nangare Patil Kardird

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खालील जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत…

  • अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
  • पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • मुंबई पोलीसदल उपायुक्त
  • ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभाग
  • नाशिक पोलीस आयुक्त
  • सद्यस्थितीत पोलीस सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था), मुंबई

विश्वास नांगरे पाटील कौटुंबिक माहिती

२८ नोव्हेंबर २००० रोजी रुपाली नांगरे पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना १ मुलगा आणि १ मुलगी अशी २ मुले आहेत.

Vishwas Nangare Patil information in Marathi

पुरस्कार

राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३)

विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेली पुस्तके

विश्वास नांगरे पाटील | Vishwas Nangare Patil books

त्यांनी खालील काही पुस्तके लिहिली आहेत :

  • मन मी है विश्वास
  • कर हर मैदान फते
  • Head Held High
  • Win All Your Battle

आर माधवन आणि विश्वास नांगरे पाटील यांची मैत्री :

Vishwas Nangare Patil information in Marathi

Vishwas Nangare Patil aani R Madhvan Yanchi Friendship / Maitri

तुम्हाला हे ऐकून कदाचित नवल वाटेल की, लहानपण त्यावेळच्या बिहार मध्ये आणि आत्ताच्या झारखंडमध्ये गेलेले आर माधवन त्याचे कॉलेज कोल्हापूरला झाले. इथल्या राजाराम कॉलेजमध्ये विश्वास नांगरे पाटील आणि माधवण एकाच वेळी शिकत होते. माधवण आणि नांगरे पाटील यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते तशीच स्पर्धा देखील होती. ‘स्टील फ्रेम’ नावच्या पुस्तकात लिहल्याप्रमाणे. माधवण आणि नांगरे पाटील कॉलेजच्या प्रेसिडेंट च्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे होते आणि यावेळी नांगरे पाटील निसटत्या मतांनी निवडून आले होते. असे जरी असले तरी माधवणची एंग्रजीवर असणारी कमांड लक्षात घेऊन अनेकदा नांगरे पाटील त्याच्याकडून इंग्रजीचे धडे घेत असत. (विश्वास नांगरे पाटील | Vishwas Nangare Patil)

महात्मा गांधी बद्दल माहिती

2 thoughts on “विश्वास नांगरे पाटील : Vishwas Nangare Patil information in Marathi | Hero of 26/11.”

Leave a Comment

You cannot copy content of this page