Marathi Ukhane : मराठी उखाणे, विवाह-सोहळ्यांमध्ये आणि विविध उत्सवांमध्ये घेतले जाणारे उखाणे या द्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेले उखाणे हे विशेष आनंद उलगडून. हे मराठी उखाणे महाराष्ट्राच्या परंपरा आणि चालीरीतींचे सार प्रेषित करतात.
Table of Contents
- Marathi Ukhane | मराठी उखाणे
- Smart Ukhane Female | स्मार्ट मराठी उखाणे.
- Shankarache Ukhane | शंकराचे मराठी उखाणे.
- Modern ukhane for female | Modern ukhane in Marathi
- Ukhane For Female | नवरी साठी चे मराठी उखाणे.
- Latest ukhane | पूजे चे मराठी उखाणे | Ukhane For Pooja in Marathi
- Unique Romantic Ukhane for Female
- Ukhane for Female for wedding Ceremony
- Navari che Romantic Ukhane | नवरी साठी छान-छान मराठी उखाणे
- Gruhpravesh ukhane | गृहप्रवेश करतानाचे मराठी उखाणे
- Sankranti Special Ukhane | मकर संक्रातीचे उखाणे
- Ukhane For Bride | नवीन नवरीसाठी उखाणे
- Haldi Kunku Ukhane | हळदी कुंकू उखाणे
- Ukhane for Female / New ukhane in Marathi
- Ukhane in Marathi for Female / नवरी साठी लग्नात घ्यायचे मराठी उखाणे / Lagnachi ukhane
- Comedy Ukhane : कॉमेडी उखाणे नवरीसाठी
- निष्कर्ष : Ukhane For Female
Marathi Ukhane | मराठी उखाणे
Ukhane | मराठी उखाणे.
“नमस्कार Ukhane For Female या लेखा मध्ये आपण मराठी उखाणे पाहणार आहोत…
हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, _ _ _ _ _ _ _ _ रावांचे चरण, हेच माझे चारही धाम. |
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, _ _ _ _ _ _ _ _रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. |
माची सुरूवात होते श्रीगणेशापासून, _ _ _ _ _ _ _ _ चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. |
तेलाच्या दिव्याला तुपाची वात, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात |
एक होती चिऊ, एक होता काऊ, _ _ _ _ _ _ _ _ चे नाव घेतो डोक नका खाऊ. |
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, _ _ _ _ _ _ _ _चे नाव घेतो सर्वजण ऐका. |
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास, _ _ _ _ _ _ _ _रावांना भरविते मी प्रेमाचा घास |
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,माझी _ _ _ _ _ _ _ _म्हणते मधुर गाणी. |
Smart Ukhane Female | स्मार्ट मराठी उखाणे.
Ukhane in Marathi | मराठी उखाणे.
“Smart Ukhane Female | स्मार्ट मराठी उखाणे.”
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा,_ _ _ _ _ _ _ _रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा. |
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, _ _ _ _ _ _ _ _ चे नाव घेण्यास केली मी सुरूवात. |
बारीक मणी घरभर पसरले, _ _ _ _ _ _ _ _ साठी माहेर विसरले. |
पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, _ _ _ _ _ _ _ _ रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता. |
लग्नात लागतात हार आणि तुरे, _ _ _ _ _ _ _ _च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. |
चंदनी पानात मुग्ध कळी हसली, _ _ _ _ _ _ _ _ रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. |
रुपेरी सागरावर चंदेरी लाट, _ _ _ _ _ _ _ _ रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. |
Shankarache Ukhane | शंकराचे मराठी उखाणे.
Ukhane | मराठी उखाणे.
“Shankarache Ukhane | शंकराचे मराठी उखाणे.”
शंकर पार्वती च्या पोटी जन्मले गणराज,_ _ _ _ _ _ _ _नी अर्पण केला सौभाग्याचा साज. |
गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, _ _ _ _ _ _ _ _रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. |
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, _ _ _ _ _ _ _ _ रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. |
यमुनेच्या जलावर पडेली ताजमहालाची सावली, _ _ _ _ _ _ _ _रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. |
Modern ukhane for female | Modern ukhane in Marathi
Ukhane | मराठी उखाणे.
“Modern ukhane for female | Modern ukhane in Marathi”
यमुनेच्या तीरावर कृष्णा वाजवतो पावा, _ _ _ _ _ _ _ _ रावांचा सहवास जन्मोजन्मी लाभावा. |
सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी, _ _ _ _ _ _ _ _ राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी. |
यु.एस मधील कंपनीत असा झाला बोलबाला, पहिल्याच ट्रायलला _ _ _ _ _ _ _ _रावांचा प्रोग्राम पूर्ण झाला |
जुईची वेणी जाईचा गजरा, आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा. |
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,_ _ _ _ _ _ _ _ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. |
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,_ _ _ _ _ _ _ _ चे नाव घेण्यास केली मी सुरूवात. |
बारीक मणी घरभर पसरले,_ _ _ _ _ _ _ _ साठी माहेर विसरले. |
पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,_ _ _ _ _ _ _ _ रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता. |
लग्नात लागतात हार आणि तुरे,_ _ _ _ _ _ _ _ च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. |
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,_ _ _ _ _ _ _ _ रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. |
Ukhane For Female | नवरी साठी चे मराठी उखाणे.
Ukhane | मराठी उखाणे.
“Ukhane For Female | नवरी साठी चे मराठी उखाणे.”
चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,_ _ _ _ _ _ _ रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे. |
देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,_ _ _ _ _ _ _ _ नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा. |
कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मी च्या गळ्यात,_ _ _ _ _ _ _ _चं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात. |
दारातील तुळशीला पाणी घालते गार,_ _ _ _ _ _ _ _ रावांच्या नावाला रात्र झाली फार. |
Latest ukhane | पूजे चे मराठी उखाणे | Ukhane For Pooja in Marathi
Ukhane | मराठी उखाणे.
“Latest ukhane | पूजे चे मराठी उखाणे | Ukhane For Pooja in Marathi”
फुलापानांची रांगोळी, काढली आज दारी_ _ _ _ _ _ _ _रावांसोबत करते मी, पूजेची तयारी |
संसाराच्या रथाचे, प्रेम आणि विश्वास सारथी_ _ _ _ _ _ _ _रावांसोबत करते, मी ची आरती |
कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मी च्या गळ्यात,_ _ _ _ _ _ _ _चं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात. |
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात_ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेते, च्या दारात |
Unique Romantic Ukhane for Female
Ukhane | मराठी उखाणे.
“Unique Romantic Ukhane for Female”
बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला _ _ _ _ _ _ _ _च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला |
देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन,_ _ _ _ _ _ _ _ मुळे झाले, संसाराचे नंदन. |
Ukhane for Female for wedding Ceremony
Ukhane | मराठी उखाणे.
“Ukhane for Female for wedding Ceremony”
संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान…_ _ _ _ _ _ _ _ रावांच नाव घेते सर्वांचा राखून मान |
मोगऱ्याचा सुगंध, स्पर्धा करतो निशिगंधाशी…_ _ _ _ _ _ _ _ चे नाव घेते, _ _ _ _ _ _ _ _च्या दिवशी |
(देवाचे नाव) आशीर्वाद दे, येऊ दे भाग्या भरती _ _ _ _ _ _ _ _रावांच्या उत्कर्षाची, कमान राहू दे चढती! |
संसाराच्या रथाचे, प्रेम आणि विश्वास सारथी_ _ _ _ _ _ _ _रावांसोबत करते, मी ची आरती |
फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी _ _ _ _ _ _ _ _ रावांचे नाव घेते,_ _ _ _ _ _ _ _ च्या वेळी. |
Navari che Romantic Ukhane | नवरी साठी छान-छान मराठी उखाणे
Ukhane | मराठी उखाणे.
“Navari che Romantic Ukhane | नवरी साठी छान-छान मराठी उखाणे”
उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ दर्जा शेतीचा, _ _ _ _ _ _ _ _नी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा. |
श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान,_ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान. |
निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी_ _ _ _ _ _ _ _चं नाव घेते खास तुमच्यासठी. |
असू नये अभिमानी, असावे मात्र स्वाभिमानी, नाव घेते, _ _ _ _ _ _ _ _ची हृदयस्वामिनी. |
Gruhpravesh ukhane | गृहप्रवेश करतानाचे मराठी उखाणे
Ukhane | मराठी उखाणे.
“Gruhpravesh ukhane | गृहप्रवेश करतानाचे मराठी उखाणे”
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज,_ _ _ _ _ _ _ _रावांच नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज. |
शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेऊन टाकते पहिले पाऊल घरात. |
वडिलांचे आशीर्वाद मातेची माया _ _ _ _ _ _ _ _सारखे पती मिळाले ही ईश्र्वराची दया |
शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता, _ _ _ _ _ _ _ _माझे सागर मी त्यांची सरिता |
लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी. |
मोह, माया, प्रेमाची जाळी पसरली दाट,_ _ _ _ _ _ _ _ ची सेवा करणे हीच मोक्षाची वाट |
Sankranti Special Ukhane | मकर संक्रातीचे उखाणे
Ukhane | मराठी उखाणे.
“Sankranti Special Ukhane | मकर संक्रातीचे उखाणे”
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवशी. |
संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्याचा मान, _ _ _ _ _ _ _ _रावांच्या जीवावर देते हळदीकुंकाच वाण. |
संक्रांतीला असते तीळ गुळाचे वान, _ _ _ _ _ _ _ _रावांनी दिला मला सौभाग्याचा मान. |
नाकातल्या नाथिला सोन्याचा साज, _ _ _ _ _ _ _ _रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज. |
नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी _ _ _ _ _ _ _ _माझा राजा आणि मी त्याची राणी |
पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _ _ _ _ _ _ _ _रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. |
कपाळाचे कुंकू, जशी चंद्राची कोर, _ _ _ _ _ _ _ _ च्या मदतीवर, सगळा माझा जोर. |
७ ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन, _ _ _ _ _ _ _ _रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण. |
आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया, _ _ _ _ _ _ _ _रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया. |
गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी, _ _ _ _ _ _ _ _रावांच नाव घेते _ _ _ _ _ _ _ _दिवशी, |
संसाररूपी सागरात पती-पत्नीच्या नौका, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका. |
संसाराच्या सारीपाटाची लागली मला चाहूल. _ _ _ _ _ _ __रावांच्या आयुष्यात मी, आज टाकलं पहिलं पाऊल. |
चांदीची जोडवी लग्नाची खूण, रावांचे नाव घेते, _ _ _ _ _ _ _ _ची सून. |
मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध, _ _ _ _ _ _ _ _सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद ! |
Ukhane For Bride | नवीन नवरीसाठी उखाणे
Ukhane | मराठी उखाणे.
“Ukhane For Bride | नवीन नवरीसाठी उखाणे”
गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे _ _ _ _ _ _ _ _च्या येण्याने, भाग्य उजळले माझे बरसला पाऊस, दरवळली माती _ _ _ _ _ _ _ _रावांसोबत, फुलली नवीन नाती माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, _ _ _ _ _ _ _ _रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे. खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, _ _ _ _ _ _ _ _रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद. पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेढे, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे. मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले, _ _ _ _ _ _ _ _रावांचे हेच रुप मला फार आवडले. Haldi Kunku Ukhane | हळदी कुंकू उखाणे
Ukhane | मराठी उखाणे.“Haldi Kunku Ukhane | हळदी कुंकू उखाणे”
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल _ _ _ _ _ _ _ _ रावांचे नाव घेते, वाजवून _च्या घराची बेल सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण. “माहेरच्या” अंगणात वाढली ही संस्काराची तुळस, _ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेत मी गाठीन मानाचा कळस. मातीत माती, माझ्या गावातली माती, _ _ _ _ _ _ _ _रावांच्या नावाचं, कुंकू लावलंय माथी.
Ukhane for Female / New ukhane in Marathi
Ukhane | मराठी उखाणे.
“Ukhane for Female / New ukhane in Marathi”
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात _ _ _ _ _ _ _ _ रावांचे नाव घेते, च्या दारात |
पंढरी आहे, विठू माऊलींचं स्थान,_ _ _ _ _ _ _ _रावांना आहे, गावी खूपच मान. |
तुमच्या आशीर्वादानं सजला, _ _ _ _ _ _ _ _ चा सोहळा,_ _ _ _ _ _रावांचं नाव ऐकायला, पूर्ण गाव झालंय गोळा. |
_ _ _ _ _ _ _ _ ला जाताना लागतो, _ _ _ _ _ _ _ _चा घाट, अख्ख्या गावात नाही कुणाचा रावांसारखा थाट. |
Ukhane in Marathi for Female / नवरी साठी लग्नात घ्यायचे मराठी उखाणे / Lagnachi ukhane
Ukhane | मराठी उखाणे.
“Ukhane for Female / नवरी साठी लग्नात घ्यायचे मराठी उखाणे / Lagnachi ukhane”
मोत्यांची माळ, सोन्याचा साज _ _ _ _ _ _ _ _रावांचे नाव घेते,_ _ _ _ _ _ _ _ आहे आज |
आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार, _ _ _ _ _ _ _ _रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार. |
कस्तुरीचा जन्म, सुगंधाकरिता, माझे जीवन अर्पण, _ _ _ _ _ _ रावांकरिता. |
कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण, _ _ _ _ _ _ रावांची आणि माझे जुळले, ३६ गुण. |
अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य, _ _ _ _ _ _ _ _ रावांचा आनंद हेच माझे सौख्य. |
गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग, _ _ _ _ _ _ _ _ रावांच्या संसारात आहे मी दंग. |
Comedy Ukhane : कॉमेडी उखाणे नवरीसाठी
Ukhane | मराठी उखाणे.
“Comedy Ukhane : कॉमेडी उखाणे नवरीसाठी”
स्वयंपाक येत नाही म्हणून _ _ _ _ _ _ _ _ राव माझ्यावर रागावले, मग काय पहिल्याच दिवशी जेवण मी झोमॅटोहून मागवले. |
कोरोनाच्या काळात लग्न म्हणजे टास्क, जिलेबीचा घास देते _ _ _ _ _ _ _ _ काढ तोंडावरचा मास्क. |
बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू _ _ _ _ _ _ _ _राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू. |
दुधाला लावले ईरजन त्याची झाली दही, _ _ _ _ _ _ _ _आणि माझी जोडी एकदम आहे सही. |
निष्कर्ष : Ukhane For Female
नमस्कार Ukhane For Female या लेखा मध्ये आपण ( Marathi Ukhane) मराठी उखाणे पहिले .. आमचा हा Ukhane For Female लेख तुम्हाला कसा वाटलं हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा….
हे हि पहा : अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे