परिचय : Pigeon and Ant story in Marathi
Kabutar ani Mungi Marathi story writing : मित्रानो / मैत्रिणींनो मी सई तुमच्या साठी घेऊन आली आहे एक छान कथा, आज मी तुम्हाला मुंगी आणि कबुतरच्या हृदयस्पर्शी मैत्रीची कथा सांगणार आहे. मैत्री हि कशी असावी हे दाखून देत मैत्रीचे खरे सार आणि दोन विलक्षण प्राण्यांमधील चिरस्थायी कशी झाली त्या बद्दल माहिती देते.
चला तर मग सुरु करूयात…..

कबुतर आणि मुंगी ची गोष्ट : Kabutar ani Mungi Marathi story writing
कडाक्याच्या पडलेल्या उन्हा मध्ये दुपारी, एक लहान मुंगी, तहानाने त्रस्त, पाण्याच्या शोधात भटकत होती. बराच वेळ भटकंती केल्यावर तिने एक छोटासा तलाव पहिला आणि आनंदाने तलावाच्या दिशेने पुढे गेली. तलावाच्या काठावर पोहचल्यावर जेव्हा तिने तलावातील थंड पाणी बघितले तर तिची तहान तृप्त करण्याची इच्छा आणखीनच धृढ झाली.

पण जेंव्हा ती पाणी प्यायला पुढे सरसावली तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. आणि खाऊ लागली गटकाळ्या खाऊ लागली , तिने वरती निघण्याचा प्रयत्न हि केला पण तिला काही जमेच ना ! आणि त्यात तिला पोहता हि येत नव्हतं …. ती आपला जीव वाचवण्या साठी धडपड करू लागली ..
त्या तलावाच्या काठावर असलेल्या असलेल्या एका झाडावर एक कबुतर बसलेलं होत, आणि त्या झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले आणि त्या बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. कबुतराने पटकन एक झाडाचे पान तोडले, आणि मुंगीकडे उडाले. त्याने ते पान मुंगीजवळ पाण्यात नेहून टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि तिच्या जीवात जीव आला…

पान तरंगत तलावाच्या काठावर आले आणि मुंगीचा जीव वाचला. जमिनीवर येऊन तिने कबुतराचे आभार मानले. आणि तिथून निघून गेले…
काही दिवसांनी एक शिकारी बंदुक घेऊन जंगलात आला. जंगलात फिरताना त्याला झाडावर कबुतराचे घरटे दिसले. कबुतर आपल्या लहान पिल्लांशी खेळण्यात मग्न होते. त्याचे लक्ष शिकाऱ्याकडे नव्हते.

शिकाऱ्याने हळुच बंदुक वर काढुन कबुतराला मारण्यासाठी नेम धरला. पण मुंगीने त्याला असे करताना पाहिले आणि कबुतराला वाचवण्यासाठी शिकाऱ्याला जाऊन पायावर कडाडुन चावली.
शिकारी कळवळला आणि त्याच्या गोळीचा नेम चुकला. पायाची आग थांबवायला तो खाली बसुन पाय चोळु लागला. पण तेवढ्यात बंदुकीच्या आवाजाने कबुतर सावध झाले आणि उडून गेले.
निराश होऊन शिकारी परत निघुन गेला, आणि कबुतराचा जीव वाचला.
तात्पर्य : Kabutar ani Mungi Marathi story writing.
आपण Pigeon and Ant story in Marathi / Kabutar ani Mungi Marathi story writing या लेखा मध्ये आपण पहिले कि, एखाद्याला निस्वार्थीपणे मदत केल्यास देव कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन आपली मदत नक्की करतो …